पंतप्रधान मोदी यांचा आम्ही आदर करतो- संजय राऊत

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली असतानाच संजय राऊत यांनी आम्हाला पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आदर असल्याचं म्हटलं आहे.;

Update: 2023-04-24 06:41 GMT

जळगाव येथील सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो, असं म्हटलं आहे.

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) आणि अमित शहा (Amit Shah ) यांच्यावर जोरदार टीका केली. त्याबरोबरच सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यानंरत सत्यपाल मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. त्यावर उध्दव ठाकरे यांनी टीका केली. त्याचाच संदर्भ देत संजय राऊत यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याविषयी आदर आहे. पण त्यांच्या चुकांविषयी बोलल्यानंतर तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकणार असाल तर ते योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

त्याबरोबरच 2024 मध्ये आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र लढून भाजपचा पराभव करू, असंही संजय राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News