देशात राष्ट्रपती निवडणूकीची धामधूम सुरू आहे. तर ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेत राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीवर चर्चा केली. या बैठकीत शरद पवार यांच्या नावावर सहमती झाली. मात्र शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधी आघाडीकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली आहे. पण हा उमेदवार कधी मिळणार? याबद्दल बोलताना विरोधी आघाडीला राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यात उशीर झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
विरोधी आघाडीला राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यास ऊशीर झाला- संजय राऊत https://t.co/GMsRUzv5qN
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) June 17, 2022