''शिवसेना एकच..'' संजय राऊत यांचे वक्तव्य..
शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे संजय राऊत यांची प्रतिकिया...;
संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं एका निर्णयाकडे लक्ष लागून आहे. आपल्याला माहित आहे राज्यात मागच्या काही महिन्यांपूर्वी काय राजकारण घडलं. ६ महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. पण शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. आता शिवसेनेत दोन गट पडल्या नंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धान्यष्यबाण हे चिन्ह कोणाचे यावरून वाद निर्माण झाला. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.
शिवसेना कोणाची यावर बोलताना शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी, शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित महाराष्ट्रात तरी होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना आहे. शिवसेना ही एकच असल्याची प्रतिकिया दिली आहे आज ते सकाळी माध्यमांशी बोलतं होते.. नक्की काय म्हणाले आहेत संजय राऊत पहा...