संजय राऊत घाबरले

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची अनेकदा जीभ घसरल्याची पहायला मिळाली. मात्र ठाण्यातील कार्यक्रमात संजय राऊत घाबरल्याचे पहायला मिळाले.;

Update: 2023-03-10 17:49 GMT

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून अनेकदा शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत वादात सापडले होते. मात्र शिवजयंतीच्या (Shivjayanti) कार्यक्रमात संजय राऊत कोथळा शब्द वापरणार नाही, असं म्हटले. त्यामुळे संजय राऊत घाबरले आहेत की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

संजय राऊत म्हणाले, छत्रपतींच्या विचाराने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे नातं कुणीच तोडू शकणार नाही. कारण समोर बसलेले काय भाडोत्री नाहीत. खोक्यावर बसून आलेले नाहीत. त्यामुळे ठाण्याचा रंग भगवा आहे आणि भगवाच राहील. ठाणे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी नक्की उभं राहिल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी त्यांच्यासाठी कोथळा शब्द वापरणार नाही. नाहीतर गुन्हा दाखल होईल, असं म्हणत सातत्याने बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे संजय राऊत नरमल्याचे पहायला मिळाले. मात्र पुढे बोलताना ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांना आपण धडा शिकवू, असा विश्वास व्यक्त केला. या मातीने अफजलखानांचे कोथळे बाहेर काढले आहेत, आपण यापुढेही काढू, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना 280 पैकी 200 लढाया या स्वकियांशी कराव्या लागल्या, असं बाळासाहेब सांगायचे. त्यामुळे आपल्यातूनच फुटून बाहेर पडलेल्यांच्या आपण छाताडावर उभं राहू. एवढंच नाही तर मी उध्दव ठाकरे यांना ठाण्यात सभा घेऊन जनतेशी संवाद साधायला सांगणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

 

Tags:    

Similar News