दसरा मेळाव्यात एक खुर्ची रिकामीच राहणार?
शिवसेनेच्या गोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता दसरा मेळाव्यातही एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार का? अशी चर्चा रंगली आहे.;
उध्दव ठाकरे यांनी गोरेगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. यावेळी व्यासपीठावर एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्या रिकाम्या खुर्चीची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी ती खुर्ची कुणासाठी आहे? याचा खुलासा केला होता. मात्र आता शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यातही एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार का? अशी चर्चा रंगली आहे.
गोरेगाव येथे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले होते की, रिकामी खुर्ची ही संजय राऊत यांच्यासाठी आहे. कारण संजय राऊत शिंदे गटात गेल्याची चर्चा होऊ नये. त्यामुळे तोच फॉर्म्युला पुन्हा शिवाजी पार्कवर वापरण्यात येण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांच्या जामीनावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. दरम्यान संजय राऊत यांना जामीन मिळाल्यास ते दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याची आशा शिवसैनिकांना होती. मात्र शिवसैनिकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना दसरा मेळावा कोठडीतच साजरा करावा लागणार आहे.
संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केली. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र संजय राऊत यांचा जामीन आणि कारागृह कोठडी याविषयी सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे संजय राऊत दसरा मेळाव्याला उपस्थित राहू शकत नाहीत. तर त्यांना दसरा हा कोठडीतच साजरा करावा लागणार आहे.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यावेळी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने ED ला 27 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र यावेळीही सुनावणी पुर्ण न होऊ शकल्याने संजय राऊत यांची कोठडी 27 सप्टेंबर पर्यंत वाढवली. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या कोठडीवर सुनावणी 10 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची कारागृह कोठडी आणि जामीन अर्जावर 10 ऑक्टोबर रोजीच सुनावणी होणार आहे.
काय आहे पत्राचाळ प्रकरण ?
मुंबईतील गोरेगाव येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भुखंड आहे. या ठिकाणी असलेल्या पत्राचाळ परिसरात 672 कुटूंबियांचा पुनर्विकास करण्यासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती 2008 मध्ये करण्यात आली. या कंपनीने या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. त्यातूनच या कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. त्यातच 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी या कंपनीचे काही शेअर्स राकेश वाधवान यांच्या एचडीआयएलला विकले. यासंदर्भात तपास करताना एचडीआयएलने 100 कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या नावाने वळवण्यात आल्याचे समोर आले. त्याबरोबरच यापैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर वळवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या पैशातून संजय राऊत यांच्या पत्नीने दादर येथे फ्लॅट घेतल्याचा दावा ईडीने केला आहे. यामुळे संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे.