"कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?" संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेना टोला

गेल्या काही दिवसांपासून खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु आहे. हे वाकयुद्ध आता खालच्यापातळीपर्यत जावून पोहचले आहे. नेमके दोघे काय म्हणाले आहेत ते वाचा...;

Update: 2023-02-24 10:21 GMT


राज्यसभेचे खासदार संजय राऊत दररोज सकाळी कोणत्या कोणत्या मुद्यावर बोलण्यासाठी पत्रकारांना उपलब्ध असतात. मात्र ते कधी काय बोलतील याचा नेम नसतो. गेल्या दोन दिवसांपासून श्रीकांत शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडा मार्फत माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची तक्रार संजय राऊत यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रीया देताना श्रीकांत शिंदे यांनी टिका केली आहे की, संजय राऊतांना उपचाराची गरज आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. श्रीकांत शिंदे हे हाडाचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी बरेच वर्ष प्रॅक्टीस केलेली नाही, एवढं मला माहिती आहे. जी माहिती मला मिळाली होती. ती माहीती पोलिसांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना एवढे अस्वस्थ होण्याचे काय कारण आहे. असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाकडून माझ्याविरोधात जे मोर्चे निघत आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही. एखादी व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. तक्रा केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का? एका गुंडाच्या समर्थनासाठी एक पक्ष रस्त्यावर उतरतो आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मात्र पोलीस आपले काम करतील, अशी प्रतिक्रीया शिंदे यांनी व्यक्त केली आहे. 

Tags:    

Similar News