संजय राऊत यांनी आम्हाला धमकी दिल्यामुळेच आम्ही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा लेखी युक्तीवाद शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला होता. त्याला संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
30 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर शिंदे (Eknath Shinde) गटाने आणि ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) लेखी युक्तीवाद केला. त्यामध्ये संजय राऊत यांनी धमकी दिल्यामुळेच आम्ही महाराष्ट्राबाहेर गेल्याचे शिंदे गटाने म्हटले होते. त्यावर प्रतिक्रीया देतांना संजय राऊत म्हणाले की, ते माझ्या ज्या भाषणाचा उल्लेख करीत आहेत. ते भाषण हे गुवाहाटीला गेल्यांतरचे आहे. त्यांनी ते व्यवस्थित ऐकावे. याबरोबरच लाठ्या मारा, त्यांना दंडूक्याने झोडपून काढा, असं शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) म्हणाल्या होत्या. आता त्यांनी स्पष्ट करावे की ते का सोडून गेल्या. त्या महाविकास आघाडी नको म्हणून, हिंदूत्वासाठी की खोके मिळाले म्हणून सोडून गेल्या. त्या प्रत्येक वेळी भूमिका बदलतात. कारण जे पळून गेले. त्यांचा पार्श्वभाग सुजवून काढा, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या होत्या. मात्र त्या त्यांना जाऊन मिळाल्या.
याबरोबरच संजय गाडकवाड (sanjay Gaikwad) यांच्यासारख्या फालतू लोकांवर बोलायला मी बांधिल नाही. आमची भूमिका आम्ही कालच स्पष्ट केली, असंही संजय राऊत म्हणाले. आम्ही अदानीच्या (Adani) विचाराने चालत नाही. त्यामुळे आज देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्याबाबत सरकारने भूमिका घ्यायला हवी.
तसेच अर्थसंकल्पाविषयी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, अर्थसंकल्प दरवर्षी येतो. त्यात घोषणा खूप असतात. पण इतकीच अपेक्षा आहे की, दोन पाच लोकांना समोर ठेऊन अर्थसंकल्प तयार होऊ नये. सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प बनवायला हवा. तर त्याचे स्वागत केले जाईल. पण राहुल गांधी म्हणतात. त्याप्रमाणे दोघांसाठी अर्थव्यवस्था बनवली जात असेल तर देश खड्यात जाईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.