आसाम सरकारने भीमाशंकरबाबत केलेल्या दाव्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाले आहे. त्यातच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. महाशिवरात्रीपुर्वी आसाम सरकारने भीमा शंकर (Bhima Shankar) हे आसाममधील कामरुप (Kamrup) येथे असल्याचा दावा केला. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्रवादीने शिंदे गटावर टीकास्र सोडताना गुवाहाटीला गेल्यानंतर ज्योतिर्लिंग (Jyotirling) दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर वादंग निर्माण झाले असतानाच आता संजय राऊत यांनीही ज्योतिर्लिंगावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आसामचे पाहुणे म्हणून गुवाहाटीला (Guwahati) जाऊन बसले होते. त्या बदल्यात त्यांनी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग आसामला दिले का? असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच संजय राऊत (sanjay Raut) पुढे म्हणाले, देव सगळ्यांचा असतो. मात्र आसामने 12 ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग भीमा शंकर हे कामरुप येथे असल्याचा दावा केला असल्याने शिंदे गटाने हे ज्योतिर्लिंग आसामला दिले का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.