Sanjay Raut Vs keshav Upadhye : जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल- संजय राऊत
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Davos) यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली होती. त्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी व्हिडीओ ट्वीट करून संजय राऊत यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी ट्वीट करून उत्तर दिले.
या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले, (Sanjay Raut Tweet) केशवराव, हे फालतू चे धंदे बंद करा. रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्लिप दाखवा आणि कंमेंट्स करा. महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात. असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल, जय महाराष्ट्र !
केशवराव
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 16, 2023
हे फालतू चे धंदे बंद करा!
रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही.
संपूर्ण क्लिप दाखवा.आणि कॉमेंट करा..महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात.असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल.
जय महाराष्ट्र! https://t.co/f7C39HWeqh
केशव उपाध्ये काय म्हणाले होते? (Keshav Upadhye Tweet)
केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांचा व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यावर लिहीले होते की, महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा? एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करीत आहात. महाराष्ट्राची माफी मागा संजय राऊत, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली होती. मात्र केशव उपाध्ये यांनी ते ट्वीट डिलीट केले आहे.
संजय राऊत यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पुन्हा एकदा केशव उपाध्ये यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, खोटं बोलण्याचा प्रश्न येत नाही. आपण शब्द वापरला की नाही? असा सवालही यावेळी केला आहे. त्याबरोबरच आपण मुळात पत्रकार संपादक, त्यात खासदार. आपल्याला राग व्यक्त करायला अशी भाषा वापरावी लागते, यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय? आणि जनतेचं दुकान कुणी बंद केलंय हे चिडचिड आणि शिव्यातून दिसत असल्याचा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
राऊत साहेब खोट बोलण्याचा प्रश्नच नाही. आपण शब्द वापरला की नाही? आपण मुळात पत्रकार संपादक, त्यात खासदार आपल्याला राग व्यक्त करायला अशी भाषा वापरावी लागते यापेक्षा महाराष्ट्राच दुदैव काय? आणि दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या.. https://t.co/MzpfLQBTY0
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 16, 2023
संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटनंतर केशव उपाध्ये यांनीही ट्वीट करून उत्तर दिले होते. मात्र केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना दिलेले उत्तराचे ट्वीट डिलीट केले आहे. त्यामुळे केशव उपाध्ये यांची चांगलीच कोंडी झाली आहे.