बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कुणीही पराभव करू शकत नाही- संजय राऊत
राज्यात शिवसेना विरुध्द शिवसेना सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे.;
शिवसेनेचा (Shivsena) नेता असेल तर गर्दी कमी पडत नाही. कारण शिवसेना बाळासाहेबांनी (Shivsena) स्थापन केली. आता झाडावरची काही पाने गळून जात आहे. नाशिकमध्ये काही नासकी पानं गळून गेले आहेत. पण शिवसेनेला वसंतासारखा बहर येईल, असं म्हणत संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यावर टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिवसेना संपवण्यासाठी नष्ट व्हावी, म्हणून दिल्लीपासून कटकारस्थान सुरु आहे. पण एक लक्षात ठेवा याच नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेचं पहिलं अधिवेशन झालं आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कुत्रा निष्ठावान असतो. पण कुत्रा कितीही निष्ठावान असला तरी त्यांची फौज वाघाच्या सेनेसोबत लढण्यासाठी चालत नाही. पुढे बोलताना संजय राऊत यांनी दावा केला की, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा (Balasahebanchi Shivsena) कुणीही पराभव करू शकत नाही. कारण शिवसेनेच्या स्थापनेनंतर देशात अनेक सेना स्थापन झाल्या. मात्र त्यापैकी भारतीय सेना (Indian Army) आणि शिवसेनाच (Shivsena) शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे 2024 मध्ये सत्तेत आल्यास व्याजासहीत सगळं परत करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.