विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यानंतर संजय राऊत यांनी मारली पलटी

हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे.

Update: 2023-03-01 09:22 GMT

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथे बोलताना विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला होता. त्यामुळे विधीमंडळात जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर अखेर संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे.

संजय राऊत म्हणाले, मी विधिमंडळाचा कधीच अपमान करणार नाही. कारण मी स्वतः देशातील सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे. त्यामुळे संसद (Parliment) आणि विधिमंडळाचा (Legislature) मी कायमच आदर केला आहे. शिवसेनेने नेहमी संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवला आहे. पण आज माझ्या वक्तव्याबद्दल सभागृहात गदारोळ करण्यात आला. मात्र त्यांनी माझ्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. मी काय म्हणालो आणि कोणत्या संदर्भाने म्हणालो, हे समजून न घेता एकाकी पध्दतीने कारवाई होत असेल तर ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेला धरून नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

माझ्यावर हक्कभंग आणण्याचा सभागृहाला पूर्ण अधिकार आहे. पण मी नेमकं काय म्हणालो, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना आणि नेत्यांना देशद्रोही म्हटले, त्याबद्दल हक्कभंग कधी आणला जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी विधिमंडळातील मिंधे गटाचा उल्लेख चोर आणि दरोडेखोर असा केला आहे. त्यामुळे मी ते वक्तव्य ज्यांनी बेईमानी आणि गद्दारी केली त्यांच्याबद्दल वापरले. त्यामध्ये विधिमंडळाचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता. मी विधिमंडळाचा अवमान करणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News