किरीट सोमय्यांनी ७५०० कोटींचा भ्रष्टाचार केला - संजय राऊत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषद घेतली.त्या पत्रकार परिषदेत किरिट सोमय्यांविरोधात जोरदार भाष्य केले.आता त्यानंतरही संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर शाब्दिक हल्ले सुरुच ठेवले आहे.सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यावधी रुपये उकळले आहेत.तसेच अमित शाहांची भीती दाखवूनही वसुली केली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.;
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषद घेतली.त्या पत्रकार परिषदेत किरिट सोमय्यांविरोधात जोरदार भाष्य केले.आता त्यानंतरही संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर शाब्दिक हल्ले सुरुच ठेवले आहे.सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यावधी रुपये उकळले आहेत.तसेच अमित शाहांची भीती दाखवूनही वसुली केली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवई परिसरातील एका पुनवर्सन प्रकल्पात ४३३ बोगस लोक घुसवून तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. यावेळी किरीट सोमय्या यांनी परवानगीसाठी देवेंद्र फडणवीस यांनाही ५० कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगून पैसे उकळल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
. पवईच्या पेरुबाग परिसरातील एका पुनर्वसन प्रकल्पात किरीट सोमय्या आणि त्यांच्या एजंटसनी ४३३ लोकांची नाव घुसवली. हे लोक या जागेवरील मूळ रहिवासी नव्हते. किरीट सोमय्या यांच्या एजंटसनी प्रत्येक व्यक्तीकडून २५ ते ५० लाख रुपये घेतले. या हिशेबाने किरीट सोमय्या यांनी तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. मी या सगळ्याची कागदपत्रे ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहेत. तसेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून याप्रकरणाची तक्रार करणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आतापर्यंत २११ प्रकरणं माझ्याकडे आल्या आहेत.आता दररोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आणणार आहे.किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शेकडो कोटी रुपये उकळले.तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नावावर धमक्या देऊनही पैसे उकळले.हे रेकॉर्डवर आहे.काय करायचे ते करा.उखाडणा है तो उखाड लो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातुन किरीट सोमय्यांवर आरोप एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ? कुठे आहे आमेल काळे ?केले आहेत. असा प्रश्न उपस्थित केला आहे.