संदीप देशपांडेवरील हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद, २ जण ताब्यात

शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निगवॉक करताना संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता. यामध्ये संदीप देशपांडे हे जखमी झाले होते. आता या हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. पोलीसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपींचा पोलीसांनी शोध घेतला.

Update: 2023-03-04 08:09 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात मास्क लावून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी स्टम्प आणि बॅटने हल्ला केला होता. या हल्लाप्रकरणी पोलीसांनी वेगवान तपास करत दोन जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आठ पथके विविध ठिकाणी पाठवली होती. या पथकांनी केलेल्या कारवाईनंतर सध्या दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत. पोलीसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे भांडुप परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामध्ये एका शिवसैनिकाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवाजी पार्क परिसरातील विविध सीसीटिव्ही फुटेज तपासले आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले. हे आरोपी संदीप देशपांडे यांना मारहाण करुन पलायन करताना सीसीटिव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरु करुन अखेर दोघांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी सध्या सुरु आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे नियमितपणे शिवाजी पार्कमध्ये मित्रांसोबत मॉर्निग वॉकला जात असतात. वॉक झाल्यानंतर एकत्रितरित्या नाक्यावर भेटतात. त्याच ठिकाणी मास्क लावून आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्प आणि बॅटने त्यांना मारहाण करुन हल्लेखोर पळून जाताला सीसीटिव्हीमध्ये कैद झाले. त्याचा आधार घेत पोलीसांनी यातील दोनजणांना अटक केली. पोलीस यांची कसून चौकशी करत आहे. संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांचे इतर मित्र न आल्यामुळे त्यांनी आपला मॉर्निग वॉक सुरु केला होता. त्यांचा एक राउंड सुद्धा पुर्ण झाला होता. त्यावेळी सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाच्या गेट क्रमांक ५ कडे पुढे जात असताना हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर कुणीतरी फटका मारला म्हणून त्यांनी मागे वळून पाहताच त्यांना चार तरूण दिसले, त्यांच्या हातात लाकडी स्टंम्प व बॅट असल्याचे संदीप देशपांडे यांनी आपल्या जबानीत पोलीसांना माहिती दिली. यावेळी हल्लेखोरांनी शिव्या घालून पत्र लिहितोस का? ठाकरेंना नडतोस का? वरुणला नडतोस का? अशा प्रकारचे वक्तव्य करत मारहाण केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच यावेळी मध्यस्थी करणाऱ्यांना सुद्धा हल्लेखोरांनी धमकावल्याचे देशपांडे यांनी सांगितले. 

Tags:    

Similar News