नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे असतील तर कोर्टात जावे, असे थेट आव्हान समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिले आहे. क्रांती रेडकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे निर्दोष असल्याचा दावा केला. समीर वानखेडे यांना स्वत:च्या धर्माचे पुरावे द्यावे लागतात याहून लाजिरवाणे काही नाही, असेही क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे. तसेच समीर वानखेडे यांना त्या जागेवरुन हटवण्यात ज्यांचा फायदा असेल त्यांनीच हे कारस्थान केले असावे, असा आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे.