म्हणून राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला... संभाजीराजे

Update: 2021-08-20 13:28 GMT

नांदेड : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नांदेडमध्ये पहिले मूक आंदोलन आज करण्यात आले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापुढे हजारोंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, आरक्षणाबाबत न्यायालयात भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून केवळ अपयशी ठरलत म्हणून तुम्ही या आंदोलनाला भेट दिली नाही का .? उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाही का ? अशी सडकून टीका अशोक चव्हाण यांच्यावर केली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेले 15 पानी पत्र मला मान्य नाही म्हणताच ,या आंदोलनाच्या वेळी उपस्थित असलेल्या आंदोलन समन्वयकांनी तात्काळ फाडले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला आमची ताकद दाखविण्यासाठी रायगडावर जावं लागेल असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे, केंद्र सरकार राज्यसरकारच्या नावाने जबाबदारी ढकलत आहे , असा आरोप करीत छत्रपती संभाजी महाराजांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आहे.

केवळ आश्वासन देऊन चालत नाही, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्याबद्दल राज्यसरकारने जबाबदारी उचलावी. रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याबाबत पाऊले उचलावीत , सारथीसाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात यावे, केंद्राने केंद्राची जबाबदारी उचलावी, राज्याने राज्याची जबाबदारी घ्यावी, 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्याची जबाबदारी उचलावी. ती पूर्ण करावी.

केंद्र आणि राज्य सरकार ,चेंडू चेंडू खेळणे बंद करावे.

आमचा कोणत्याही सरकारशी वाद नाहीये , ज्यांनी त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी. संसदेत मला बोलू दिलं गेलं नाही , म्हणून आपण राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला , देशातील समस्त बहुजन समाजाला आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या पण तुला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे हे दुर्दैव आहे अशी नाराजी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

आंदोलनासाठी गर्दी करायचं तर आपण कशीही करू शकतो, फक्त तिसऱ्या लाटेला आपण गांभीर्याने घेतले पाहीजे. असाही सल्ला त्यांनी उपस्थित समुदायाला दिला.

Tags:    

Similar News