Shivsena : संभाजी राजे यांचा उध्दव ठाकरे यांना सल्ला
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिल्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी उध्दव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.;
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिल्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी उध्दव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष (Shivsena) नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण (Bow And Arrow) हे शिंदे गटाला दिल्यामुळे हा उध्दव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांनी थेट उध्दव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
संभाजी राजे म्हणाले, माझ्या दृष्टीने चिन्ह आणि नाव कुणाला मिळते हा लोकशाहीचा (Democracy) भाग आहे. अशा प्रकारे चिन्ह आणि पक्ष कुणालाही मिळाला तरी लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पण निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. त्यामुळे या निर्णयावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाला हे मान्य नसेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे, असा थेट सल्ला संभाजी राजे छत्रपती यांनी उध्दव ठाकरे यांना दिला आहे.
काँग्रेसचे वलय पुर्वीच खाली आले आहे. तर भाजप आणि शिंदे यांचं काय चाललं आहे मला माहिती नाही, असं म्हणत संभाजी राजे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविषयीच्या प्रश्नाला फाटा दिला.