संभाजी ब्रिगेडची 'शिल्लक सेने'सोबतची युती शिवसैनिकांसाठी वेदनादायी , शिंदे गटाचा घणाघात

शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

Update: 2022-08-27 05:40 GMT

शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर शिंदे गटाने त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडची शिल्लकसेनेसोबतची युती शिवसैनिकांसाठी वेदनादायी असल्याची टीका शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

शीतल म्हात्रे म्हणाल्या की, जातपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिल्लक सेनेने केली. ही युती सर्वसामान्य शिवसैनिकासाठी अत्यंत वेदनादायक आहे, असा थेट हल्लाबोल शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली.

पुढे बोलताना शीतल म्हात्रे म्हणाल्या की, संभाजी ब्रिगेड ही नक्की कुणाची बी टीम आहे, हे माहीत असूनही ही युती करणं हे अनाकलनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

ज्या विचारामधून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला आणि ज्यांच्या पाठबळावर ही संघटना विस्तारली. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांनी युती करायला हवी होती. मात्र तसे न करता त्यांनी शिल्लक सेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा नक्की कुणाच्या सांगण्यावरून घेतला असेल, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

शीतल म्हात्रे म्हणाल्या की,प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जात पात विरहित राजकारण करण्याच्या परंपरेला संभाजी ब्रिगेडसोबत युती करून छेद देण्याचा प्रयत्न शिवसैनिकाला निश्चित पटणार नाही. तसेच युती सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असताना युती सरकारच्या विरोधात ज्या ब्रिगेडने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यासोबत जाण्याचा शिल्लक सेनेचा निर्णय नक्कीच भूषणावह नाही, असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी शिवसेनचा उल्लेख शिल्लकसेना असा केला.

Tags:    

Similar News