'बोलणं हे जिवंतपणाचे लक्षण', सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर जहरी टीका
सदाभाऊ खोत यांच्याकडून महाविकास आघाडीवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच आता सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.;
वासाडगावच्या पाटलाच्या बोलण्याला अर्थ नसतो, म्हणत सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी थेट शरद पवार (Sharad pawar) यांच्यावरच टीका केली आहे. ते सोलापूर (Solapur) येथे बोलत होते.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार यांनी अजित पवार (Ajit pawar) हे मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य केलं होतं. पण वासाडगावच्या पाटलाच्या बोलण्याला अर्थ नसतो, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार यांना बोलावं लागतं. कारण बोलणं हे जीवंतपणाचे लक्षण असल्याची जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली. (Sadabhau khot criticize to Sharad pawar)
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा अजित पवार यांच्यामुळे थांबला आहे. एकदा अजित पवार यांचा मुहूर्त ठरला की, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जाईल, असं मतही यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. (Sadabhau khot comment on ministry expansion)