ED च्या चौकशीला परमवीर सिंग गैरहजर, प्रकृतीचे दिले कारण

Update: 2021-07-12 08:14 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली आहे. याच प्रकरणात हायकोर्टाने संबंधित सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर ED ने परमबीर सिंग यांनाही नोटीस बजावली होती. त्यांना ईडीने सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. पण परबमीर सिंग यांनी प्रकृतीचे कारण देत गैरहजर राहिले आहेत. आपली प्रकृती बरी नसून आपले ऑपरेशनही ठरले आहे, असे त्यांनी ईडीला कळवले आहे.

मुंबईच्या आयुक्तपदी असताना परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे पत्र लिहिले होते. तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते,असा गंभीर आरोप केला होता. यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तर परबमीर सिंग यांच्या मागणीवरुन हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयने प्राथमिक चौकशीसाठी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील गुन्हा दाखल केला होता.

पण अनिल देशमुख यांनी या कारवाईला हायकोर्टात आव्हान दिले आहे. यावर हायकोर्टाने सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय ज्या समितीने घेतला, त्यातील सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या समितीमध्ये पोलीस आयुक्त म्हणून परमवीर सिंग यांचाही समावेश होता. तसेच सचिन वाझेच्या नियुक्तीची जबाबदारी त्यांना झटकता येता येणार नाही, असेही कोर्टाने फटकारले होते.

Tags:    

Similar News