"आम्हाला अपक्ष नेत्यांची गरज नव्हती" - सचिन अहिर यांचे वक्तव्य

Update: 2022-11-27 10:16 GMT

 भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena)यांची सध्या महाराष्ट्रात सत्ता असल्यामुळे ठाकरे गटातील नेते शिंदे गटातीन नेत्यांवर टीका करताना पाहायाला मिळतं आहे. ठाकरे गटातील नेते सचिन अहिर यांनी अपक्ष निवडून आलेले बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांच्यावरती टीकास्त्र सोडले आहे. सचिन अहिर म्हणाले की "महाविकास आघाडीला अपक्ष नेत्यांची गरज नव्हती तरिदेखील त्यांना जनतेच्या सेवेसाठी मंत्रीमंडाळात स्थान दिले.

बच्चू कडू यांना शिवसेना गटातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर खाती ही त्यांना देण्यात आली होती.

राजेंद्र यड्रावकर यांना देखील महाविकास आघाडीच्या काळात आरोग्य व कुटुंब कल्याण,वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य तसेच इतर खाते त्यांना ही देण्यात आली होती. परंतू सध्याच्या मंत्रीमंडाळात त्यांना कोणतीच खाती देण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांना राजकारणात महत्त्व किती व कोणी दिलंय याचा विचार त्यांनी करावा" सचिन अहिरे यांच्या टीकेला बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यानच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर अहिर यांनी भाष्य केलेय, "अडीच वर्षांपूर्वी आम्ही म्हणतोय राज्यपालाना परत पाठवा अशी मागणी केली होती. राज्यपाल यांना परत पाठवण्याबद्दल केंद्राशी बोलणं झालंय असं म्हणायचं तर दुसरीकडे राज्यपाल यांना पाठींबा देयाचा. हे काम सध्याच्या राजकारणात सुरु आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांचे संतुलन बिघडलय" असे अहिर म्हणाले.

Tags:    

Similar News