गोंधळामधे संसदेत पहील्याच दिवशी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज संसदेत १२ राज्यसभा सदस्यांच्या निलंबनावरुन गोंधळ झाला. लोकसभेचे कामकाज सुरु होताच दोन वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. राज्यसभेत विरोधी पक्षानं १२ खासदारांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केल्यानंतर सभापती वैकय्या नायडूंनी नाकारल्यानंतर गोंधळातच कामकाज सुरु आहे.
संसदेच्या मागील मॉन्सून सत्राच्या वेळेस विमा विधेयक मंजूर करताना गोंधळ घातल्याप्रकरणी 12 खासदारांना निलंबीत करण्यात आलं होतं. संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी (प्रल्हाद जोशी) सदस्यांनी माफी मागीतली तर निलंबन मागे घेऊ शकतो असे सांगितले.
आज लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी सभात्याग केला. गोंधळ सुरुच राहील्यानं लोकसभा अध्यक्षांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मलिकार्जून खर्गेंनी निलंबन मागे घेण्याची मागणी केली. तत्पूर्वी विरोधीपक्षाच्या सदस्यांनी दालनामधे सभापतींची भेट घेतली होती. सभापती वेंकय्या नायडूंनी निलंबन मागे घेणं अशक्य असल्याचं सागितलं. त्यानंतर गोंधळात कामकाज सुरुच राहीलं. सभापतीनी निलंबनाच्या कारवाईवर सविस्तर विवेचन
12 निलंबीत खासदारांमधे एल्मारम करीम (माकपा), फुलो देवी नेताम (काॅंग्रेस), छाया वर्मा (काॅंग्रेस), रिपुन बोरा (काॅंग्रेस), बिनोय विस्वाम (भाकपा), राजमणि पटेल (काॅंग्रेस), डोला सेन ( तृणमूल काॅंग्रेस), शांत छेत्री ( तृणमूल काॅंग्रेस), सैयद नासिर हुसैन ( काॅंग्रेस), प्रियंका चतुर्वेदी ( शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) और अखिलेश प्रसाद सिंह ( काॅंग्रेस) यांचा समावेश आहे.सभापती वैंकय्या नायडूंनी खासदारांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. सदस्यांची नावं पुकारुनही सदस्य चर्चा करत नाही असं सांगितलं.