मोर्चात कधीच सामील न होणाऱ्या रश्मी ठाकरेंची हल्लाबोल मोर्चात एन्ट्री...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सून आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राजकीय पटलावर कधीच कोणत्याच मोर्चात सहभागी झाल्या नव्हत्या, मात्र महाविकास आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या हल्लाबोल मोर्चात पहिल्यांदाच रश्मी ठाकरे ह्या उद्धव ठाकरेंबरोबर मोर्चात सहभागी झाल्या.
महाविकास आघाडीच्या मुंबई येथील मोर्चात दुपारी 12 नंतर माजी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर रश्मी ठाकरे ह्या सामील झाल्याने मोर्चाचे सर्वांत लक्षवेधी ठरलं.रश्मी ठाकरे ह्या कधीच राजकीय मोर्चात सहभागी झाल्या नव्हत्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्यानंतर शपथविधी साठी रश्मी ठाकरे ह्या पहिल्यांदाच व्यासपीठावर आल्या होत्या. त्यानंतर काही कार्यक्रमांना हजेरी लावल्या होत्या, मात्र मोर्चात त्या पहिल्यांदाच सहभागी झाल्या. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.