राज्यसभा खासदारांचा शपथविधी
10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी मतदान होऊन मतमोजणी पुर्ण झाली. त्यामुळे देशातील नवनिर्वाचित 57 राज्यसभा खासदारांचा आज शपथविधी होणार आहे.;
राज्यसभेच्या नवनिर्वाचित 57 खासदारांचा शपथविधी शुक्रवारी होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इमरान प्रतापगडी, धनंजय महाडिक, पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक पार पडली. त्यामध्ये 41 जागा बिनविरोध झाल्या. तर उर्वरित 16 जागांवर निवडणूक पार पडली. मात्र या निवडणूकीत काँग्रेसचे अजय माकन, मीडिया मुगल सुभाष चंद्रा यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला. तर रणदीपसिंह सुरजेवाला, पियुष गोयल, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी, घनशाम तिवारी, निर्मला सितारामण, जग्गेश, लाहर सिंह, जयराम रमेश, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, प्रफुल्ल पटेल, इमरान प्रतापगढी, संजय राऊत, कार्तिकेय शर्मा आणि कृष्णलाल पवार यांचा विजय झाला. तर या नवनिर्वाचित 57 खासदारांचा शपथविधी होणार आहे.
राज्यात राज्यसभा निवडणूक चांगलीच गाजली. यामध्ये सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे पियुष गोयल, धनंजय महाडिक, अनिल बोंडे यांचा तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे विजयी झाले. महाराष्ट्रातून विजयी झालेले सहाही खासदार आज राज्यसभा सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत.