भाजपचं मिशन साउथ, पीटी उषा, इलयराजा, वीरेंद्र हेगडे विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर निवड

काय आहे भाजपचं मिशन साऊथ, ४ दिग्गज व्यक्तीची राज्यसभेवर निवड… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती…;

Update: 2022-07-06 17:09 GMT

भारताचे राष्ट्रपती कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील १२ व्यक्तींची विविध क्षेत्रात निवड करत असतात. पैकी रिक्त झालेल्या ४ जागेवर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर ४ दिग्गज व्यक्तीची नियुक्ती केली आहे.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. नियुक्त झालेल्या खासदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

नियुक्त खासदारांमध्ये खेळाडू पीटी उषा, संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे, लेखक वी. विजयेंद्र प्रसाद यांचा समावेश आहे.

पैकी वी विजयेंद्र प्रसाद हे दक्षिणात्य चित्रपटातील मोठं नाव आहे. त्यांनी प्रसिद्ध बाहूबली चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. ते प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली चे वडील आहेत.

भाजपचं मिशन साऊथ…

राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले चार ही खासदार पाहिले तर दक्षिणेतील चार वेगवेगळ्या राज्यातून आणि चार वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांची निवड करण्यात आली आहे.

खेळाडू पी टी उषा या केरळ राज्यातून येतात. इलयराजा हे तामिळनाडूतून येतात. वीरेंद्र हेगडे हे कर्नाटकाचे आहेत. तर प्रसिद्ध पटकथाकार विजयेंद्र प्रसाद हे आंध्रप्रदेश मधून येतात.

यावरून भाजपचं मिशन साउथ दिसून येते. आत्ताच भाजपने पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची हैद्राबाद मध्ये घेतली होती. भाजपचा उत्तर भारतात मोठा विस्तार आहे. मात्र, दक्षिणेतील अनेक राज्यात भाजप नावापुरताच आहे. ही बाब लक्षात घेता भाजप ने आता मिशन साउथ हाती घेतल्याचं दिसून येते.

Tags:    

Similar News