#SoniaGandhi : अशोक गेहलोत यांनी मागितली सोनिया गांधी यांची माफी

अशोक गेहलोत यांनी मागितली सोनिया गांधी यांची माफी. पण नेमकं काय आहे कारण? जाणून घेण्यासाठी वाचा...;

Update: 2022-09-29 10:51 GMT

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांची माफी मागत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतुन काढता पाय घेतला.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असलेल्या अशोक गेहलोत यांनी आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतुन माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची माफी मागितली.

अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगतले की, दोन दिवसांपुर्वी राजस्थानमध्ये जे काही राजकीय नाट्य घडले. त्याबद्दल राजस्थानचा मुख्यमंत्री या नात्याने नैतिक आधारावर मी सोनिया गांधी यांची माफी मागितली. मात्र राजस्थानमध्ये जे काही घडले, त्या घडामोडींमध्ये माझा काहीही हात नाही. तसेच मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे म्हणत अशोक गेहलोत यांनी सर्वांना धक्का दिला.

पुढे बोलताना अशोक गेहलोत म्हणाले, मी पुढे राजस्थानचा मुख्यमंत्री राहील की नाही? याचा निर्णय पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या घेतील. मात्र दोन दिवसांपुर्वी राजस्थानमध्ये जे काही घडले, त्यामुळे मी हादरून गेलो आहे, असे ही अशोक गेहलोत म्हणाले.

मी राजीव गांधींपासून ते सोनिया गांधी यांच्यापर्यंत गेल्या 50 वर्षात इमानदार शिपायासारखं काम केले आहे. मात्र राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी राजस्थानचा मुख्यमंत्री या नात्याने सोनिया गांधी यांची माफी मागितली.

Tags:    

Similar News