राहुल गांधी यांची मध्यस्थी यशस्वी, राजस्थानमध्ये सचिन पायलट, अशोक गेहलोत यांच्यात समझोता

Ashok Gehlot Vs Sachin pilot : मागील काही दिवसांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुध्द सचिन पायलट वाद पेटला होता. या वादात अखेर काँग्रेसच्या (Congress) हायकमांडने मध्यस्थी केली आहे.;

Update: 2023-05-29 20:45 GMT

गेल्या काही दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी अशोक गेहलोत यांच्याविरुध्द रणशिंग फुंकले होते. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्याची जबाबदारी कमलनाथ (Kamalnath) यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र कमलनाथ यांना अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समेट घडविण्यात यश आले नाही.

सचिन पायलट यांनी वसुंधराराजे (Vasundhararaje) यांच्या सरकारच्या काळातील कामांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र अशोक गेहलोत सरकार वसुंधराराजे यांच्या सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची (Corruption Case) चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सचिन पायलट यांनी केला. दुसरीकडे अशोक गेहलोत यांनीही सचिन पायलट (Sachin pilot) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या वादाचा आगामी काळातील विधानसभा निवडणूकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हायकमांडने यामध्ये लक्ष घातले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह के सी वेणूगोपाल यांनी दोन्ही नेत्यांशी समोरा-समोर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही के सी वेणूगोपाल यांच्यासमवेत अशोक गेहलोत, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुखजिंदर सिंग रंधवा (Sukhajindar Singh Randhava) आणि सचिन पायलट माध्यमासमोर आले. यावेळी के सी वेणूगोपाल यांनी दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाला असल्याचे जाहीर केले.

के सी वेणूगोपाल यांनी ट्वीट (KC Venugopal Tweet) करून म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत 4 तासांची चर्चा झाली. यामध्ये राजस्थानचे इनचार्ज सुखजिंदर सिंग रंधवा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट उपस्थित होते.

आम्ही विधानसभेसाठी एक टीम म्हणून लढणार आहोत आणि दशकभरातील सरकार बदलण्याची परंपरा ब्रेक करून नवा विजय साजरा करणार आहोत, असं मत के सी वेणूगोपाल यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News