cabinet reshuffle राजस्थान: सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा
राजस्थान सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी होऊ शकतो. राजस्थानमध्ये सध्या 21 मंत्री आहेत, घटनेतील तरतुदीनुसार आणखी 9 मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाऊ शकतो.
एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, सचिन पायलट गटातील 6 आमदारांना मंत्री केले जाऊ शकते आणि सचिन पायलट यांना देशस्तरावर काँग्रेस संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
बसपाला सरकारमध्ये स्थान याशिवाय बहुजन समाज पक्षाच्या काही आमदारांनाही सरकारमध्ये सामील केलं जाऊ शकतं. कारण बसपाच्या सर्व आमदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या गटातील आमदारांपैकी एकाला मंत्रीपद दिलं जाऊ शकतं.