शिवसेना गोठल्यानंतर मनसे प्रवक्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीयांवर राज ठाकरे भडकले

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव गोठवल्यानंतर मनसेने उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन राज ठाकरे मनसे प्रवक्त्यांवर चांगलेच भडकले आहेत.;

Update: 2022-10-10 01:42 GMT

शिवसेनेतील दोन्ही गटाने आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यावर मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले की, संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांच्या पक्षाचे नावही गोठले आणि चिन्हही, कालाय तस्मै नमः, असं म्हणत उध्दव ठाकरे गटावर टीका केली.

तसेच मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले होते की, चिन्ह बदलतात, कुणाची गोठतात, मात्र आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावते.

मनसे नेते गजानन काळे यांनी पक्ष आणि चिन्ह गोठवल्यानंतर ट्वीट करून, धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही. आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादी च "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार आहे. संपलेल्या पक्षा बद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा, अशी खोचक टीका मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली.

मनसे प्रवक्त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयांवरून राज ठाकरे यांनी यापुढे कोणत्याही मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत प्रतिक्रीया देऊ नये, असे थेट आदेश दिले आहेत.

Tags:    

Similar News