उद्धव ठाकरेंचा राजीनामा मनसेची पहिली प्रतिक्रिया

Update: 2022-06-30 03:36 GMT

सुप्रीम कोर्टाने बुहमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर विविध स्तरातून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होते आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेपुढे आणि उद्धव ठाकरे यांच्यापुढे आव्हान असल्याचे सांगितले जाते आहे. या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे पहिली प्रतिक्रिया आली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांचे एक जुने ट्विट शेअर करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. "सत्ता येते आणि जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही" असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन वाद सुरू असताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले होते.

दुसरीकडे मनसे नेते अमेय खोपकर यांनीही एक ट्विट केले आहे. "प्रत्येक प्रसंगात मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे नुकसान करणाऱ्या, राजसाहेबांची माणसं फोडणाऱ्या, राजसाहेब यांच्या बद्दल सतत द्वेषाच राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही! जय मनसे"

असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:    

Similar News