पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे.
महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 8 विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष व वरीष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. 2 महिन्यात राज ठाकरे यांचा हा आठवा दौरा आहे.
यादरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाऊ नयेत अशी भूमिका देखील मांडली आता या बैठकीमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.