Raj Thackeray : राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला

Raj Thackeray : राज्यात अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.;

Update: 2023-04-27 03:18 GMT

Maharashtra Politics : राज्यात सत्तापालट होऊन नऊ महिनेही पूर्ण झाले नाहीत. तोच नव्या मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अजित पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यापार्श्वभूमीवर धाराशिव, नागपूर आणि मुंबईत अजित पवार (Ajit pawar Next CM Banner) यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समर्थकांनीही अशाच प्रकारे बॅनरबाजी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? याविषयी चर्चा सुरू आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना राज ठाकरे यांना लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल? असा सवाल केला.

अमृता फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे (Raj Thackeray Advice to Eknath Shinde) यांनी एकाच शब्दात उत्तर दिले. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांना सावध रहा, असं म्हणाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नेमकं कुणापासून सावध रहायचं? असा नवा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याबरोबरच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपपासून, राष्ट्रवादीपासून की उध्दव ठाकरे यांच्यापैकी कुणापासून सावध रहावे, हा नवा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Tags:    

Similar News