राहुल गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईसाठी भावनिक ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांची प्रकृती बिघडल्यामुळे राहुल गांधी यांनी ट्वीट द्वारे भावनीक पोस्ट केली.;
राजकारणात नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं चित्र नेहमी दिसतं. मात्र, आज राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भावूक होताना दिसले. नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनी वयाच्या १०० व्या वर्षात नुकतेचं पर्दापण केले होते. परंतू त्यांची तब्येत अचानकपणे बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या आईची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी देवाकडे सर्वजण प्रार्थना करत आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी ट्विट केले की, आई आणि मुलामधील प्रेम अनंत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठिण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की, तुमची आई लवकर बरी होईल.
सध्या नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन ह्या अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये येथे दाखल केले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार हिराबेन मोदी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.