पेगासस कांड: राहुल गांधी यांची विरोधी पक्षांशी 'नाश्ते पे चर्चा'

Rahul Gandhi to host opposition meeting on breakfast

Update: 2021-08-03 06:15 GMT

 सध्या दिल्ली येथे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरीचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळं संसदेचं कामकाज वारंवार ठप्प पडत आहे. विरोधक पेगासस प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहेत.

त्यातच आज राहुल गांधी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना नाष्ट्यासाठी बोलावलं होतं. राहुल गांधी यांच्या या Breakfast Diplomacy ला 14 पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याचं सांगितलं जातंय. त्यामध्ये प्रामुख्याने कॉग्रेस, एनसीपी, शिवसेना, राष्‍ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, माकपा, भाकपा, आईयूएमएल, आरएसपी, केसीएम, जेएमएम, नॅशनल कॉन्फर्नस, तृणमूल कॉग्रेस आणि एलजेडी चे नेते उपस्थित होते.

त्यामुळं विरोधी पक्षातील नेत्यांची आता या Breakfast Diplomacy मध्ये काय रणनिती ठरते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काय आहे प्रकरण?

पेगासेस प्रकरणात ४० हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते, नरेंद्र मोदी सरकारमधील दोन विद्यमान मंत्री, सुरक्षा संस्थांचे सध्याचे आणि माजी प्रमुख अधिकारी आणि मोठ्या संख्येने व्यावसायिकांची नावे समाविष्ट आहेत.

मात्र, फ्रान्समध्ये हे प्रकरण समोर येताच चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतात मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सरकारने कोणाचीही हेरगिरी केली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणाच्या चौकशी चे कोणतेही आदेश दिलेले नाहीत.

तर दुसरीकडे, एनएसओ समूहाचा देश असलेल्या इज्राइल सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची टीम तयार केली आहे.

Full View

Tags:    

Similar News