ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांचं घर वाचावायचं होतं, राहुल गांधी यांचा निशाणा

Rahul Gandhi on Jyotiraditya Scindia, says scared ones joined BJP RSS ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांचं घर वाचावायचं होतं, ते आरएसएस मध्ये सहभागी झाले...;

Update: 2021-07-17 04:26 GMT

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी कॉंग्रेसमधील घाबरलेले लोक भाजप आणि आरएसएस मध्ये सहभागी होण्यासाठी स्वतंत्र असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांचा देखील उल्लेख केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांचं घर वाचायचं होतं. म्हणून ते घाबरले, आणि आरएसएस जॉइन केलं.

असं म्हणत थेट ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला. राहुल यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जे लोक निडर आहेत. त्या लोकांना कॉंग्रेसमध्ये सहभागी करुन घ्या. आणि पक्षात जे लोक घाबरले आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. असा थेट संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. Rahul Gandhi on Jyotiraditya Scindia

पीटीआय वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

ते आरएसएस चे लोक आहेत. त्यांना जाऊ द्यावं, त्यांना आनंद घेऊ द्यात, आपल्याला त्यांची गरज नाही. आपल्याला निडर लोक हवेत. ही आपली विचारधारा आहे. हा माझा मूळ संदेश आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, "त्यांना त्यांचं घर चालावायचं होतं. ते घाबरले होते. ते आरएसएस मध्ये सहभागी झाले.'' 'आरएसएस ठराविक लोकांना मोठं करण्याचा विचार करते.'

'मी तुमचा भाऊ आहे. तुम्हाला तुमच्या भावाशी बोलण्याची भीती वाटायला नको.' असा संवाद राहुल यांनी कार्यकर्त्यांशी साधला आहे.

तेलंगाना चे उत्तम कुमार रेड्डी यांनी राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Tags:    

Similar News