दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक, अमित शहा यांना घेरणार
दिल्ली येथे सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सध्या पेगासस कथित हेरगिरीचा मुद्दा गाजत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पेगासस कथित हेरगिरी प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत लोकसभेत या सर्व प्रकरणासंदर्भात स्थगन प्रस्ताव आणण्यासंदर्भात चर्चा झाली. ही चर्चा गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित केली जावी. अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला कॉंग्रेस नेत्यांसह शिवसेना, सीपीआई, सीपीएम, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी, एनसीपी, मुस्लिम लीग आणि तमिलनाडु चे डीएमके चे नेते सहभागी झाले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपानंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मोदी यांनी विरोधी पक्ष संसदेचं काम करु देत नाही. असा आरोप केला होता.
कोण कोण होतं उपस्थित?
राहुल गांधी यांच्या उपस्थित लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, डीएमके चे टीआर बालू आणि कनिमोई, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते प्रफुल पटेल, शिवसेना अरविंद सावंत, केरल कॉंग्रेस (एम) चे थॉमस चाझिकादान, नॅशनल कॉन्फ्रेंस चे हसनैन मसूदी, आरएसपी चे एनके प्रेमचंद्रन, मुस्लिम लीग चे ईटी मोहम्मद बशीर आणि सीपीएम चे एस वेंकटेशन आणि एएम आरिफ सहभागी झाले होते.
दरम्यान पेगासस प्रकरणावर अनेक देशांनी चौकशीचे आदेश दिले असताना भारत सरकार या प्रकरणावर चौकशी का करत नाही.