आपने मेरा दिल दिल तोड़ा है.. राहुल गांधींची महाराष्ट्राकडे तक्रार
आपने मेरा दिल तोडा है..., अशी तक्रार राहुल गांधी यांनी का केली? जाणून घेण्यासाठी वाचा...
आपने मेरा दिल तोड़ा है, मैं यात्रा पर हूँ और मेरे मन में जो आया वो खुलकर आपके सामने रख रहा हूँ असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राकडे तक्रार केली आहे.
भारत जोडो यात्रा दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेचा हा तिसरा दिवस आहे. यात्रेदरम्यान शेकडो लोकं राहुल गांधी यांना भेटत असतात. चर्चा करत असतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला राहुल गांधी यांना काहीतरी सांगायचं असतं. राहुल गांधी ही प्रत्येकाचं म्हणणं मन लावून ऐकत असतात. असंच एका लहानग्या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर राहुल गांधी हेलावून गेले, आणि त्यांनी आपल्या मनातील खंत जाहीर सभेत बोलून दाखवली.
आपने मेरा दिल तोड़ा है म्हणत राहुल गांधी यांनी सर्व मराठी जनांकडे आपली खंत मांडली. एका लहान मुलीने राहुल गांधींकडे तक्रार केली की तिचे आई वडील तिला कमी प्रेम करतात आणि तिच्या भावाला जास्त. राहुल गांधींनी लहान मुलीला विचारलं घरी भावांबरोबर भांडण होतं का, मग काय करते त्यावेळी त्या मुलीने उत्तर दिलं की, तर आई वडिलांकडे तक्रार केली तर ते ऐकत नाहीत. मुलींना अशी भेदभावाची वागणूक देऊ नका, ज्या देश-प्रदेशात महिलांना दुय्यम वागणूक मिळते तो देश प्रगती करू शकत नाही असं ही राहुल गांधी यांनी आपल्या सभेत सांगितलं.
महाराष्ट्रातील जितक्या मुलींशी आपण बोललो त्यातील बहुतेक सर्वांनाच डॉक्टर बनायचं असतं असं ही राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्याला निराश करणार नाही असं ही राहुल म्हणाले.
काय म्हणाले राहुल गांधी ऐकण्यासाठी क्लिक करा -