सहकारी साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांवर राधाकृष्ण विखे घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट
अहमदनगर : राज्यातील सहकारी साखर कारखानदारी (co-operative sugar factories) सध्या आर्थिक अडचणीत सापडली असून, अनेक सहकारी साखर कारखान्यांवर कर्ज वाढले आहे, जप्तीच्या नोटिसा, केंद्राकडून कारवाईची टांगती तलवार असे अनेक प्रश्न कारखान्यांसमोर आहेत. यंदाचा गळीत हंगाम सुरू होत असताना एफआरपीचा विषय सध्या कळीचा मुद्दा आहे. या परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी आज दिल्लीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सहकारी साखर कारखानदारीतील दांडगा अभ्यास असणारे आमदार राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushn Vikhe) आणि हर्षवर्धन पाटील हे देखील असणार आहेत.
राज्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने कर्जात बुडाली आहेत. अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी कारखान्यांनवर दहा हजार कोटींच्या वसुलीबाबत केंद्राची टांगती तलवार आहे. तसेच दीर्घ मुदतीच्या कर्जाबाबत मुदतवाढीचा मुद्दा आहे. चालू हंगामात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून या वाढीव ऊसाचे गाळप करायचे कसे? , त्यासाठी बंद असलेली साखर कारखाने सुरू करणे हा देखील विषय आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाकडून एकरकमी एफआरपीची मागणी जोर धरत आहे. साखर कारखानदारीच्या या विविध प्रश्नांवर चर्चा आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी फडणवीस, विखे,हर्षवर्धन पाटील आदी केंद्रीयमंत्री शाह यांची भेट घेणार आहेत.