भाजपचे टेंन्शन वाढले?

Update: 2023-02-11 10:39 GMT

पुण्यातील पोट निवडणुकीसाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मैदानात उतरले आहेत. आणि त्यांच्यासोबत भाजपचे ४० स्टार प्रचारकदेखील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहे. भाजपने पुण्यातील पोटनिवडणुक प्रतिष्ठेची केल्याचे यावरुन पाहायला मिळत आहे.

  पुण्यात पोट निवडणुकीच्या प्रचाराला सर्वच पक्षांनी जोरदारपणे सुरवात केली आहे. यामध्ये भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले मात्र यामध्ये भाजपला यश आले नाही. महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. आणि त्यांच्या नेत्यांना विश्वास आहे की, या निवडणुकीत आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्यांने विजयी होईल.

तर दुसरीकडे या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपले ४० स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी या निवडणुकीकडे जातीने लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

भाजपचे स्टार प्रचारक खालीलप्रमाणे आहेत...

या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणुक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले. गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे. अमर साबळे या नावांचा समावेश आहे.

भाजपचे टेंन्शन वाढले?

कसब्यात महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र चिंचवडमध्ये बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली, कसब्यात बाळासाहेब दाभेकर, आप आणि संभाजी ब्रिगेडने उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ असं जाहीर केले. यामुंळे कसब्यात महाविकास आघाडीला मार्ग सुकर झाला. मात्र ब्राम्हणांना उमेदवारी नाकारल्याने हिंदू महासंघ पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरलं आहे. अध्यक्ष आनंद दवे हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपची मतं फुटण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परंपरागत असलेला भाजपलाच मोठ्या तयारीने निवडणुकीच्या रिंगणार उतरावं लागणार आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुक रंगतदार होणार आहे. 

Tags:    

Similar News