Ajit pawar : अजित पवार नॉट रिचेबल का होते? अखेर केला खुलासा

Update: 2023-04-08 05:43 GMT
Ajit pawar : अजित पवार नॉट रिचेबल का होते? अखेर केला खुलासा
  • whatsapp icon

अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र अजित पवार हे पुण्यात ज्वेलरीच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी नॉट रिचेबल असण्याचे कारण सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले, शरद पवार यांनी अदानींबाबत जी भूमिका घेतली आहे. ती आमची भूमिका आहे. त्याबरोबरच नॉट रिचेबल असण्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, गेल्या काही दिवसात माझी जागरणं जास्त झाले. त्यामुळे मला पित्ताचा त्रास होत होता. म्हणून मी जिजाईला जाऊन गोळ्या घेतल्या आणि झोपलो. मात्र रात्रीपासून माझ्याबाबत ज्या बातम्या येत आहेत. त्या बातम्या पाहून मला प्रचंड वाईट वाटलं. माध्यमात काहीही बातम्या दिल्या जात आहेत. आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बातम्या देता. पण एखाद्याची बदनामी पण किती करावी, याचंही लिमिट असतं, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी मीडियाला खोचक टोला लगावला. यामध्ये तुम्हाला आमच्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे. पण एखाद्याची किती बदनामी करावी, याचाही विचार करायला हवा. 

 Full View

Tags:    

Similar News