प्रशांत किशोरांनी केले कॉंग्रेससाठी `हात` वर : कॉंग्रेसमधे प्रवेशास दिला नकार

अत्यंत न्याट्यमय घडामोडीनंतर अखेर निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर(Prashant Kishore) कॉंग्रेसमधे (Congress) सहभागी होणार नाही असं स्पष्ट झालं आहे. कॉंग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्याकडून ट्विट करुन यासंबधीची माहीती देण्यात आली आहे.

Update: 2022-04-26 11:54 GMT

काँग्रेस २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना आखत आहे.गेली काही दिवस प्रशांत किशोर यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुढील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी 'सक्षम कृती गट - 2024' ची घोषणा केली आहे. याशिवाय किशोर यांच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी त्यांनी विशेष समितीची बैठकही पार पडली होती. त्यासाठी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापुढे सादरीकरण केले होते. त्यावर सोनिया गांधी यांनी एक समिती नेमली होती. या समितीत प्रशांत किशोर यांनी सहभागी व्हावे, अशी सोनिया यांची अपेक्षा होती. मात्र, ही त्यांची ऑफर प्रशांत किशोर यांनी धुडकावली आहे.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. गेले अनेक दिवस ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांनी या चर्चांना विराम दिला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

कॉंग्रेसने प्रशांत किशोर यांना पक्षप्रवेशासाठी निमंत्रण दिले होते. प्रशांत किशोर यांच्या सादरीकरण आणि चर्चेनंतर पक्षाने नेमलेल्या 'सक्षम कृती गट - 2024' ने त्यांच्या पक्षप्रवेशासाठी निमंत्रीत केलं होतं. त्यामधे त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यांनी पक्षप्रवेशास नकार दिला असून त्यांनी दिलेल्या सूचना आणि मेहनतीचे आम्ही कौतुक करतो असे रणदिप सुर्जेवाला यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने पक्षात सामील होण्याच्या अटीवर संघटनेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे कॉंग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. किशोर यांनी औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा की व्यावसायिक सहाय्यक म्हणून त्यांच्यासोबत राहायचे हे पक्षाने त्यांच्यावर सोपवले आहे. अलीकडे काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांमध्ये मोठ्या बैठका पार पडल्या होत्या.

त्यावर प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन उत्तर दिलं आहे.

प्रशांत किशोर यांनीच याबाबत एक ट्वीट करत माहिती दिली आहे. ' काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर स्वीकारण्यास मी नकार दिला आहे. माझ्या मते, काँग्रेसला आज चांगल्या नेतृत्वाची आणि संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल करण्याची जास्त गरज आहे. काँग्रेसपुढे ज्या समस्या आहेत, त्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी सर्वांची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे', असे ट्वीट किशोर यांनी केले आहे.

राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. रिपोर्टनुसार, प्रशांत किशोर काँग्रेस प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे टीम राहुलची अस्वस्थता वाढली आहे. वास्तविक, प्रशांत किशोर यांची नवीन रिंग लीडर होईल या विचाराने ते अस्वस्थ आहेत. काँग्रेस पॅनलच्या एका सदस्याने सांगितले की, "प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा की नाही हे ठरवायचे आणि नेतृत्वाला सांगायचे आहे." त्यांचे स्वागत आहे... पण त्यांना पक्षाच्या घटनेनुसार काम करावे लागेल. नेतृत्व हायजॅक करेल आणि अटी घालून पक्ष चालवेल, अशी अपेक्षा कोणीही करू शकत नाही.

Tags:    

Similar News