26/11 वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पद सोडावं लागलं होतं : संजय राऊत

26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी काही सहकाऱ्यांसह पाहणी दौरा केला होता.त्यानंतर त्यांना आपलं पद सोडावं लागलं होतं. त्यामुळे महापूर झालेल्या ठिकाणी राजकीय दौरे करून तिथल्या बचावकार्यात राजकीय नेत्यांनी अडथळे निर्माण करू नये असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.;

Update: 2021-07-27 07:14 GMT

26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी काही सहकाऱ्यांसह पाहणी दौरा केला होता.त्यानंतर त्यांना आपलं पद सोडावं लागलं होतं. त्यामुळे महापूर झालेल्या ठिकाणी राजकीय दौरे करून तिथल्या बचावकार्यात राजकीय नेत्यांनी अडथळे निर्माण करू नये असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जगभरात ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळी बचावकार्यात अडथळे येऊ नये हा नियम आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही घटना घडतात तेव्हा शक्‍यतो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे, हल्ले करणे हे थांबले पाहिजे असं खा. राऊत यांनी म्हटलं आहे.

...तर ते माणुसकी शून्य काम करत आहेत

महापुराच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी केंद्राची मदत मिळवतांना श्रेयवाद सुरू आहे का? यावर बोलतांना खा.राऊत म्हणाले की , महाराष्ट्र आपला आहे, कोकण , सातारा, सांगली आपली आहे , तिथली माणसं आपली आहे, प्रत्येकाला असं वाटतंय कीआपण मदत करावी, आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, अशी प्रत्येकाची भुमिका आहे. यात काही श्रेयाची लढाई नाही, हा श्रेयवाद नाही, जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकी शून्य काम करत आहेत असं राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक आणावा

महाराष्ट्रावर आलेल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत. पण केंद्राचीही जबाबदारी आहे. केंद्राला सर्वाधिक कर देणार राज्य महाराष्ट्र आहे विशेषतः मुंबई. आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही पण, केंद्र आमचा बाप आहे महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहे. त्यांनी काही घोषणा केलेली आहे, त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा. जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत - गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News