राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा
मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये हजारो नागरिकांनी ओणम कापणीचा सण साजरा केला. यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरात राजा महाबलीच्या पुनरागमनचा हा उत्सव साजरा केला जातो, राजा महाबलीच्या राजवटीत प्रत्येकजण आनंदात आणि समानतेने जगला होता. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशाला शुभेच्छा दिल्या. "सकारात्मकता, चैतन्य, बंधुता आणि सौहार्दाशी संबंधित सण ओणमच्या शुभेच्छा. मी प्रत्येकाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो," असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
ओणम सण हा केरळमध्ये विशेष पद्धतीने साजरा केला जातो. फुलांचा गालिचा, नवीन कपडे आणि भव्य मेजवानी देऊन हा सण साजर केला जातो. दक्षिणेकडील राज्याच्या काही भागात, महाबलीची वेशभूषा करत हा सण साजरा होतो, पारंपारिक दिवे आणि भाताने भरलेल्या भांड्यांसह महाबलीची वेशभूषा केलेल्या व्यक्तीचे स्वागत केले जाते.