डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा, मोदी सरकारचं कोव्हिड काळातील अपयश आहे का?

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा का? PM Modi Cabinet Expansion Cabinet reshuffle why Dr. harsh vardhan resigns

Update: 2021-07-07 10:22 GMT


आज होणाऱ्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात 'कही खुशी कही गम' असल्याचं चित्र आहे. या मंत्रीमंडळ विस्तापुर्वी अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहेत. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं नाव देखील आहे. फक्त आरोग्य मंत्रीच नाही तर आरोग्य राज्यमंत्र्यांचा देखील पत्ता कट झाल्याचं कळतंय.

यावरुन मोदी सरकारचं आरोग्य खातं सांभाळणारे डॉ. हर्षवर्धन यांची कामगीरी चांगली नसल्याचं स्पष्ट होतं. एकंदरीतच डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे मोदी सरकारचं आरोग्य खातं कोव्हीड काळात अपयशी ठरल्याचं प्रमाणपत्रच म्हणायचं काय़ असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

कोरोना काळात गंगा नदीच्या पाण्यावर तरंगलेले कोरोना रुग्णांचे मृतदेह, अनेकांचा ऑक्सिजन अभावी झालेला मृत्यू यामुळं मोदी सरकारची जगभरात नाचक्की झाली होती. जगभरातील मोठ्या वृत्तपत्रांनी मोदी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले होते. त्यामुळं स्वत: नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळं डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला असल्याचं बोललं जात आहे.

आज संध्याकाळी साडेपाच सहा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत. Union Cabinet expansion तर आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात 14 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तर अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

कोण इन कोण आऊट

नारायण राणे

ज्योतिरादित्य सिंधिया

सर्बानंद सोनोवाल

आरसीपी सिंह

अजय भट्ट, सांसद नैनीताल

अजय मिश्रा

कपिल पाटिल

भागवत कराड

डॉ. भारती पवार

शोभा करांदलाजे

पुरुषोत्तम रुपाला

जी किशन रेड्डी

पशुपति पारस

मीनाक्षी लेखी

अनुप्रिया पटेल

भूपेंद्रयादव

सुनीता दुग्गल

शांतनु ठाकुर, सांसद, प. बंगाल

अनुराग ठाकुर


यांचा होणार पत्ता कट?

डॉ. हर्षवर्धन

रावसाहेब दानवे पाटिल

देबाश्री चौधरी

रतन लाल कटारिया

सदानंद गौडा

थावरचंद गहलोत

रमेश पोखरियाल निशंक

संतोष गंगवार

संजय धौत्रे

यांना मिळणार प्रमोशन?

अनुराग ठाकुर

पुरुषोत्तम रुपाला

जी किशन रेड्डी

किरण रिजिजू

हरदीप सिंह पुरी

मानुष मा

महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?

नारायण राणे पत्नीसह दिल्लीत दाखल झाले आहेत. तसंच महाराष्ट्रातून खासदार कपिल पाटील, हिना गावीत, भागवत करता यांच्या नावाची चर्चा आहे.

Tags:    

Similar News