PM MODI यांच्या सल्लागारांच्या अनेक संपादकांना धमक्या?

Update: 2022-09-19 04:34 GMT

गेल्या काही वर्षात न्यूज चॅनेल्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक गंभीर आरोप केला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या देशभरातील लोकप्रतिनिधींच्या सभेतील भाषणात अरविंद केजरीवाल यांनी हा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार Hiren Joshi यांनी न्यूज चॅनेल्सचे संपादक आणि मालक यांना धमक्या दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

केजरीवाल यांच्या बातम्या कव्हर करणाऱ्या न्यूज चॅनेल्सच्या संपादक आणि मालकांना हिरेन जोशी यांनी मेसेज करुन धमक्या दिल्या आहेत, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीची कोणतीही बातमी दाखवली तर तुम्हाला त्याचे गंभीर भोगाव लागतील, अशी धमकी हिरेन जोशी यांनी दिली होती, अशी माहिती आपल्याला काही संपादकांनीच दिली आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

हिरेन जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम सल्लागार आहेत. सध्या ते PMOमध्ये माध्यम आणि आयटी विभागात OSD म्हणून काम करतात. "अऱविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीबद्दलच्या बातम्या दाखवल्या तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्ही ऐकले नाही तर आम्ही हे करु ते करु. आम आदमी पार्टीच्या बातम्या दाखवून तुम्ही चॅनेलचा गैरवापर करत आहात, अशी धमकी हिरेन जोशी यांनी आपल्याला दिली आहे, अशी माहिती संपादकांनी दिली" असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन अऱविंद केजरीवाल यांच्या रविवारी जोरदार टीका केली. केजरीवाल यांचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत, गुजरातमध्ये त्यांना पराभव दिसत असल्याने केजरीवाल आरोप करु लागले आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे. 


Tags:    

Similar News