बाप रे ! न्यायालयाने राज ठाकरे यांना ठोठावला चक्क 500 रुपयांचा दंड
राज ठाकरे यांच्याविरोधात परळी येथे सुरु असलेला खटल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांना चक्क 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
2008 मध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात परळीच्या न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याची सुनावणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. त्यामध्ये तारीख पे तारीख सुरु होती. मात्र आज अखेर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्ह्याचा निकाल दिला आहे.
परळी न्यायालयासमोर राज ठाकरे हजर राहिले. कोविड काळामध्ये ज्यावेळेस कोर्टाची सुनावणी होती. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स बजावले होते. त्यावेळी राज ठाकरे अनुपस्थित राहिले. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. मात्र त्यावेळी राज ठाकरे यांची एक सर्जरी झाली होती. डॉक्टरांनी त्यांना काही प्रोटोकॉल फॉलो करायला सांगितले होते. त्यामुळे राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज न्यायालयाला विनंती वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने राज ठाकरे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधातील वॉरंट रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.