Parambir Singh Case: परमबीर सिंह प्रकरणी कारवाईचे विधानसभा उपाध्यक्षांचे आदेश
Zirwal instructs to probe Nipunge case Parambir Singh Case: परमबीर सिंह प्रकरणी कारवाईचे विधानसभा उपाध्यक्षांचे आदेश;
मुंबई: नाशिकचे पोलीस उप अधीक्षक शामकुमार भिकाजी निपुंगे यांनी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आय़ुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात 14 जूनला नाशिकच्या आडगाव पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती, त्याबाबत अद्यापही गुन्हा नोंद झालेला नाही.
या संदर्भात आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेनं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची उपाध्यक्ष झिरवाळ यांनी गंभीर दखल घेत नाशिकच्या पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
वसुलीच्या आड येतो म्हणून परबीर सिंह यांनी खोट्या गुन्ह्यात कसे अडकवले याचा व्हिडीओ श्यामकुमार निपुंगे यांचे सहकारी कदम यांनी प्रसारमाध्यमात प्रसिद्ध केला होता. श्यामकुमार निपुंगे यांनीही परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ती दाखल करून घेतली गेली नाही. तसेच त्या तक्रारीवरून एफआयारही दाखल केला गेला नाही.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महादेव कोळी समाजातर्फे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली असून, श्यामकुमार निपुंगे यांनी ते आदिवासी असल्याकारणाने त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आणि परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार करूनही त्याचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली नाही, या त्यांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम ४-चे हे उल्लंघन आहे. तरीही संबंधित पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करावी व त्याचा अहवाल विधानसभा उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Narhari Zirwal, parambir singh, Anil Deshmukh, shyamkumar nipunge case Zirwal instructs to probe Nipunge case