थेट पंतप्रधानपदावर भाष्य; पंकजा मुंडेंच्या मनात नक्की चाललंय तरी काय...?

देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का ? असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी मतदारसंघातील जल जीवन मिशन कामाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खद्खद् बोलून दाखवली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट पंतप्रधान पदावरच भाष्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.;

Update: 2023-03-21 10:00 GMT

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, एकदा मी शेजारच्या गावात गेले तर तिथले लोक म्हणत होते. ताई तुम्ही फक्त महिला म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नाही, मी विचारलं का असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की, महिला विकास करु शकत नाही. एवढं देऊन पण म्हणतात, महिला विकास करु शकत नाही. एवढं तर कुठल्या पुरुषाने दिलं नाही. मग माझं काही चुकलंय का? माझ्यात काही खोट आहे का? माझ्याकडून कोणाचं काही नुकसान झालंय का, असेल तर तसंही सांगा.

एवढं काम करुन पण तुम्ही म्हणता महिला विकास करु शकत नाही.आज देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तर तुमची लेक नाही होऊ शकत का,असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. त्यासाठी तुम्ही एकजुटीने साथ द्यायला पाहिजे. तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता, त्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हटलं जातं का? तुम्ही एकजुटीने साथ द्या असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माणसासाठी काम करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहे. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पण त्यांच्या या विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या निवडणुकीत झालेला पराभव, पक्षातून डावललं जाण्याची भावना यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडेची नाराजी उघड आहे. त्यातच जलजीवन मिशन योजनेच्या भूमीपूजनावरुन गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आतापासून आगामी 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.

Tags:    

Similar News