महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही, पंकजा मुंडे संतापल्या

चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊरव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून पंकजा मुंडे यांनी महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.;

Update: 2022-12-12 11:58 GMT

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) गेल्या तीन दिवसांपासून कायम चर्चेत आहेत. त्यांनी पैठण (Paithan) येथे बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा काढल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde म्हणाल्या, महापुरुषाविषयी बोलणं हा जन्मसिद्ध अधिकार आहे. एखाद्या व्यक्ती चांगल्या भावनेने बोलतो, एकदा शब्द खालीवर होतो, त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचा आपण कुठेतरी मोठा बोभाटा करतो. हे हा सुद्धा महापुरुषाची अहवेलना आहे. शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती पाहून असं पाहून माझं मन खिन्न झालं. महापुरुषाविषयी वाईट बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही, आपण होतो का ? त्या काळात जीवंत, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. आपल्याला माहित आहे का ? त्या काळात तलवारीला धार कशी द्यायची? युद्ध कसं करायचं ? स्वतःच्या अंगावर घाव कसे घ्यायचे, तह कसे करायचे आणि त्या काळातील महापुरुष कसे रहायचे? पण आत्ता महापुरुषांबाबत सर्रास वक्तव्य केलं जात आहे. त्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल तर त्या संघर्षाची थट्टा सुद्धा करू नये, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्यपाल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मी रुकणार नाही. मी थकणार नाही. पदासाठी मी कुणासमोर झुकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींना इशारा दिला आहे. तसेच टाळ वाजवण्यालासुध्दा एक नियम असतो. लय आणि रिदम असतो. तसा देश आणि राज्य चालवण्यासाठीही नियम असतो, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. फक्त सरकारसाठीच नाही तर नियम विरोधकांनाही लागू होतो पण हे नियम तोडले जात असल्याची खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.


Full View

Tags:    

Similar News