पंकजा मुंडे यांनी सोडली मंत्रीपदाची आशा

विधानपरिषदेपाठोपाठ मंत्रीमंडळातही संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी पंकजा मुंडे मंत्रीपदाची अपेक्षा सोडल्याचे दिसून आले.;

Update: 2022-10-05 09:22 GMT

राज्यात एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची अपेक्षा सोडल्याचे दिसून आले.पंकजा मुंडे सावरगाव घाट येथे भगवानबाबा मुक्तीगड येथे मेळाव्यात बोलत होत्या.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2024 ला मला पक्षाने तिकीट दिले तर परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर फिरणार, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.

पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली होती. मात्र महादेव जानकर यांच्या पाठोपाठ माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी बोलताना आपण कोणत्याही पदाची अपेक्षा बाळगत नसल्याचे म्हटले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी संघर्षाला कधीही घाबरत नाही. मी कधीही रुकणार नाही, कधीही थकणार नाही. कधीही झुकणार नाही. मी संघर्ष करणार. मी आगीतून कधीही नारळ बाहेर काढायला घाबरणार नाही. गर्दी माझी शक्ती आहे. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत होत नाही. दीनदयाळ उपाध्याय यांचाही वारसा चालवते. शत्रु वरही कधी चुकून बोलत नाही. नरेंद्र मोदीच्या चरणी मी नतमस्तक होईल. मी बाहेर सभा घेतल्यामुळे मला परळीत लक्ष देता आले नाही. व्यक्ती पेक्षा संघटन श्रेष्ठ आहे. मी 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. मी पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही. गोपीनाथ मुंडे च्या नावाला बट्टा लागणार असं वागणार नाही. तसेच मला पक्षाने तिकीट दिले तरच मी 2024 ला परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

मी अमरावती, वाशिम, सिंदखेड राजा यासह संपुर्ण महाराष्ट्रभर फिरणार. लोकांचे प्रश्न सोडवणार. मी झोपेचे आणि जेवणाचे सहा तास सोडले तर उरलेले सर्व तास जनतेच्या सेवेत असेल. त्याबरोबरच पंकजा मुंडे यांनी हताश होत आता विषय संपला असं वक्तव्य केलं. तसेच आता पदाची अपेक्षा करायची नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. त्यामुळे पंकजा मुंडे यांची मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागणार नसल्याची कुणकुण लागल्यानेच पंकजा मुंडे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्याची चर्चा रंगली आहे.

Tags:    

Similar News