ड्रग्जपासून दूर रहा, बाकी काय करायचंय ते करा, पंकजा मुंडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.;

Update: 2023-02-03 07:59 GMT

बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईतील एका महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनात बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी समाजातील अप्रिय घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, सर्वांनी व्यसनापासून दूर रहायला पाहिजे. पण त्यात सगळ्यात जास्त ड्रग्जपासून दूर रहा. बाकी तुम्हाला काय करायचं आहे ते करा, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ड्रग्ज हे आतंकवादापेक्षाही घातक आहे. त्यामुळे तुम्ही ड्रग्जपासून दूर रहा. कारण तुम्ही भारताच्या स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष बघणार आहात. तुम्ही हवेत गाड्या चाललेल्या पाहणार आहात. हे सगळं पाहत असताना तुम्ही एकमेकांना समान बघणार आहात का? असा सवाल केला. यावेळी विद्यार्थ्यांनी होकार दर्शवला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही एकमेकांना सन्मान द्या, मैत्री करा, काय करायचं आहे ते करा. पण व्यसनांपासून दूर रहा. कुणावर अत्याचार करू नका. ज्या देशाला कुणी शस्रास्राने हरवू शकत नाही. त्या देशावर ड्रग्जच्या माध्यमातून छुपे हल्ले केले जातात. त्यामुळे हा नवा आतंकवाद आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

Tags:    

Similar News